हिंदू नवसंवत्सर, सार्वभौम प्रगतीचा काळ
नव वर्षाला सकाळी ६.५५ पासून गुढी उभारण्याचा मुहूर्त छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च (हिं.स.)। शालिवाहन शक १९४८ ''पराभव'' नामसंवत्सराचा प्रारंभ यंदा चैत्र शुद्ध प्रतिपदा, १९ मार्च २०२६ रोजी होत असून, या नववर्षाचा राजा गृहराज बृहस्पती असणार असल्याने
हिंदू नवसंवत्सर, सार्वभौम प्रगतीचा काळ


नव वर्षाला सकाळी ६.५५ पासून गुढी उभारण्याचा मुहूर्त

छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च (हिं.स.)। शालिवाहन शक १९४८ 'पराभव' नामसंवत्सराचा प्रारंभ यंदा चैत्र शुद्ध प्रतिपदा, १९ मार्च २०२६ रोजी होत असून, या नववर्षाचा राजा गृहराज बृहस्पती असणार असल्याने वर्षभरात जनसामान्यांच्या ज्ञानात भर पडून सार्वभौम प्रगतीचा काळ राहील.

चैत्र शुद्ध प्रतिपदा १९ मार्च रोजी सकाळी ६.५४ वाजेनंतर सुरू होत असल्याने याच वेळेनंतर गुढी (ब्रह्मध्वज) उभारून पूजन करावे. 'ब्रह्मध्वज

नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्तस्मिनसंवत्सरे नित्यं मद्ग्रहे मंगलं कुरु' या मंत्राने गुढीची पूजा करावी

पुराणानुसार ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून याच दिवसापासून कालगणना सुरू केली. तसेच प्रभू श्रीरामांनी चौदा वर्षांचा वनवास संपवून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केल्याने त्यांच्या स्वागतार्थ गुढ्या उभारल्या गेल्याची आख्यायिका आहे. शालिवाहन शकाची सुरुवातही पैठण येथूनयाच दिवशी झाली.गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंगस्नान करून दाराला तोरण लावावे, नवीन वस्त्रे परिधान करावी आणि चौरंगावर गुढी उभारावी. बांबूची काठी, रेशमी वस्त्र, पितळ-तांबे किंवा चांदीचा पालथा कलश, फुलांचे हार, साखरेची घाटी, खारीक-खोबरे यांचा वापर करून गुढी सजवावी. कुटुंबाच्या आरोग्य, आयुष्य व समृद्धीसाठी संकल्प करून 'ॐ ब्रह्मध्वजाय नमः' या मंत्राने पूजन करावे.

वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त कडुनिंबाची पाने, मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांचे मिश्रण सेवन करण्याची परंपरा असून यामुळे आरोग्य लाभते. गुढी उभारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना वैज्ञानिक महत्त्वही आहे. बांबू ऑक्सिजन वाढवतो, धातूंचा कलश सकारात्मक ऊर्जा खेचतो,

याच दिवसापासून वासंती नवरात्रालाही प्रारंभ होत असून प्रतिपदेपासून नवमीपर्यंत भगवती व प्रभू श्रीरामांची भक्ती करण्याचा विशेष काळ मानला जातो. या काळात थंड पदार्थ, मोगऱ्याची व गुलाबाची फुले अर्पण करण्याची प्रथा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन, वास्तू, भूमी, सुवर्ण व गृहउपयोगी वस्तू खरेदी अत्यंत लाभदायक ठरते. खरेदीसाठी सकाळी ११.०६ वाजेपासून दुपारी २.०७ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ५ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत मुहूर्त आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande