
हिंगोली, 18 मार्च (हिं.स.) : जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-2026 अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ही मोहीम आयोजित करण्यात आली असून, चित्ररथ आणि भित्तीपत्रिकांच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांची सविस्तर माहिती दिली जात आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळून त्यांना त्याचा लाभ घेता यावा हा आहे.
या मोहिमेदरम्यान कानडखेडा खु., कनका, कन्हेरगाव नाका, चिंचोली, राजुरा, इसापूर (रमणा), बळसोंड, केसापूर, नरसी नामदेव, पहेनी, इंचा, हनवतखेडा, राहोली बु., डिग्रस कऱ्हाळे आदी गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचत असून, यामुळे लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे.हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis