सीएचएमई भोसला नाशिकतर्फे उद्यापासून भव्य किरणोत्सव पर्व
हनुमान जन्मोत्सवापर्यत आध्यात्मिक कार्यक्रमांची मालिका नाशिक, 18 मार्च, (हिं.स.)। `सीएचएमई भोसला नाशिक`तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्या(ता.१९) गुढीपाडव्यापासून हनुमान जन्मोत्सवा(२ एप्रिल)पर्यंत भव्य आणि प्रेरणादायी आध्यात्मिक पर्वाचे आयोजन करण्य
CHME Bhonsala Nashik's


CHME Bhonsala Nashik's


हनुमान जन्मोत्सवापर्यत आध्यात्मिक कार्यक्रमांची मालिका

नाशिक, 18 मार्च, (हिं.स.)। `सीएचएमई भोसला नाशिक`तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्या(ता.१९) गुढीपाडव्यापासून हनुमान जन्मोत्सवा(२ एप्रिल)पर्यंत भव्य आणि प्रेरणादायी आध्यात्मिक पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कालावधीत मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीवर पडणारे सूर्यकिरण थेट मूर्तीच्या पायाला स्पर्श करतात.“किरणोत्सव” म्हणून ओळखला जाणारा हा अद्वितीय आणि दुर्मिळ सोहळा नाशिककरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून भक्तीभाव जागवणारा एक दिव्य अनुभव ठरतो.

समाजात सद्भाव संस्कार आणि श्रीराम भक्तीचा व्यापक प्रसार करणे हा या उपक्रमांमागील मुख्य उद्देश आहे. या पवित्र पर्वानिमित्त मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, रामनाम जपयज्ञ तसेच रामनाम लेखनयज्ञ यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहे. या मंदीर परिसरातील रामनवमीचा उत्साह सुध्दा अनोखा असाच असतो. रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्राला भोसला समूहातर्फे सघोष सशस्त्र अश्वदलासह सन्मान सलामी दिली जाईल.

या मंदीरातील राम हा विद्यार्थी दशेतील असून शस्त्र आणि शास्त्रांने पारंगत असल्याचे दिसते, विशेष म्हणजे रामाची मुर्ती ही बंदुकीच्या गोळ्यातील आवरणांचा( बुलेटस शेल्फ) वापर करून तयार करण्यात आली आहे. अतिशय लोभस, मनमोहक आणि सहजपणे पाहताक्षणी डोळ्यात भरणारी, असे हे राममुर्तीचे रूप आहे, गुढीपाडव्यांपासून सुरु होणारा हा उत्सव हनुमानजयंतीपर्यत विविध कार्यक्रमांनी उत्तरोत्तर रंगत जात असतो. रामनवमीच्या दिवशी रामजन्मोत्सवाबरोबरच होणारे अन्य कार्यक्रम हे लक्षवेधी ठरत असतात. राममुर्ती,पादुकांवरील हा किरणोत्सव याचि देही याचि डोळा पाहण्यासह इतर कार्यक्रमांतही नाशिककरांनी सहकुटूंब सहभागी व्हावे,असे आवाहन संस्थेच्या श्रीराममंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे.

-------------------------------------------------------

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande