ग्राहकाने स्वतः जागरूक होऊन आपल्या हक्काचे संरक्षण करावे - जिल्हाधिकारी स्वामी
छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च, (हिं.स.)। बाजारपेठेत मिळणाऱ्या विविध वस्तू, उत्पादने याची गुणवत्ता ,किंमत आणि दर्जेदारपणा याबाबतच्या नोंदी पाहूनच ग्राहकाने वस्तूंची आणि उत्पादनाची खरेदी करावी . ग्राहक म्हणून आपण आपल्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी जागर
Q


छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च, (हिं.स.)। बाजारपेठेत मिळणाऱ्या विविध वस्तू, उत्पादने याची गुणवत्ता ,किंमत आणि दर्जेदारपणा याबाबतच्या नोंदी पाहूनच ग्राहकाने वस्तूंची आणि उत्पादनाची खरेदी करावी . ग्राहक म्हणून आपण आपल्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी जागरूक रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कार्यक्रमाचे जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी , अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील, वजने व मापे विभागाचे शिवाजी मुंडे, पोलीस प्रशासन परिवहन, आरोग्य विभाग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ग्राहकानी विविध उत्पादन खरेदी करून होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकाने स्वतः उत्पादन किंवा वस्तू याबाबतची खातरजमा करणे आवश्यक आहे .त्याचबरोबर झालेल्या फसवणुकीबाबत ग्राहक न्यायालयात दाद मागणे ही महत्त्वाचे आहे .जागरूक राहून स्वतःच्या हक्काचे संरक्षण करणे तसेच इतरांनाही होणाऱ्या फसवणुकीपासून परावृत्तकरणे आवश्यक आहे.विविध भेसळ आणि निकृष्ट वस्तू मुळे ग्राहकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे .विविध आजारांनाही खाद्यपदार्थां मधील भेसळेतून निमंत्रण दिले जात आहे .यासाठी ग्राहक आणि जागरूक होऊन आरोग्य आणि आपल्या हक्क, कर्तव्याबाबतही जागृत रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले .

कार्यक्रमात डॉ. मिलिंद जोशी यांनी आयुष्यमान भारत योजनेसाठी आयुष्यमान योजनेचे कार्ड आवश्यक असल्याचे महत्त्व पटवून दिले. यामध्ये प्रत्येक कुटुंब पाच लाखापर्यंत आरोग्य विमा संरक्षण व उपचाराचा खर्च मिळतो .तसेच वय वंदन योजनेअंतर्गत वयाच्या ७० वर्षानंतर आरोग्य व उपचार सुविधा या योजनेअंतर्गत मिळतात. यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन यांनी कार्यक्रमात केले.

रस्ता सुरक्षा अंतर्गत ,परिवहन विभागाने अपघात होऊ नये यासाठी नियमाचे पालन, अपघात झालेला असल्यास वैद्यकीय मदत.व इतर मदत मिळावी यासाठी अपघात निवारण कक्ष कसा उपयोगी पडतो याची माहिती दिली.

ग्राहक संरक्षण समितीचे अशासकीय सदस्यांची या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थिती होती. यामध्ये राजेश मेहता, संगीता धारूरकर, धनंजय मुळे, नानक वेदी, अशोक ठोंबरे,शेख अनवर शेख कौसर यांच्यासह इतर सदस्य आणि रास्त धान्य दुकानदार या कार्यक्रमात उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande