लोह्यात २९ मार्चला शेतकरी अधिवेशन, उपमुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित
नांदेड, 18 मार्च (हिं.स.)। शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन व शिवसेना पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन येथील बैल बाजार मैदानावर रविवारी (ता.२९) सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार असल्याच
लोह्यात २९ मार्चला शेतकरी अधिवेशन, उपमुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित


नांदेड, 18 मार्च (हिं.स.)।

शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन व शिवसेना पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन येथील बैल बाजार मैदानावर रविवारी (ता.२९) सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी लोहा येथे दिली. या कार्यक्रमाला जवळपास ४० हजार शेतकरी उपस्थित राहणार आहेत, असे शंकर अण्णा धोंडगे यांनी सांगितले.

शंकर अण्णा धोंडगे म्हणाले, गेल्या तीन ते चार दशकांच्या वाटचालीत

शंकर अण्णा धोंडगे चळवळीतील कार्यकर्त्यांनी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. आम्ही याआधी बीआरएसमध्ये प्रवेश केला, त्यानंतर एमआरएसची स्थापना केली आणि नंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील

अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत काम करण्यासाठी प्रवेश केला. महाराष्ट्रात शेतकरी व कष्टकरी यांच्याबाबत धडाकेबाज निर्णय घेणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतात, असे त्यांनी नमूद केले. यावेळी दता पवार, मारोती पंढरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, शिवसेना तालुकाप्रमुख नागोराव उमरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष यंडाळे, आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande