
नांदेड, 18 मार्च (हिं.स.)।
छत्रपती शिवाजी महाराज चौका जवळील दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने पाच दुकाने आगीत भस्मसात झाली. या आगीमुळे प्रथमदर्शनी जवळपास एक कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.
महावितरणच्या ताराच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने साईबाबा उपहार गृह, साई कृपा आईस कांडी, ओम साई हार्डवेअर मशनरी अँण्ड ऑटोमोबाईल्स, दीपक बुट हाऊस, ओम साई मोबाईल ग्राफी इत्यादी दुकाने जळून खाक होऊन दुकानाची राख झाली. आग लागल्याने गावकऱ्यांनी अतोनात प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आगीने रौद्र रूप धारण केल्याने आतील कोणतेच सामान बाहेर काढण्यास आगीने वेळच दिला नाही.
सदरील घटनेची माहिती ग्रामस्थानी अग्निशमन दल हिमायतनगर येथे कळवल्याने तेथील गाडी घटनास्थळी आली असता त्याच्यात पाणी उपलब्ध नसल्याने गावातील पाण्याचे टँकर घटनास्थळावर उपस्थित असल्याने हिमायतनगर येथील
अग्निशमन दलाच्या गाडीत गावातील नागरिकांनी भांडे, बकेट घेऊन अग्निशमन गाडीत टाकावे लागले परिस्थितीचे गांभीर्य पाहून किनवट येथील अग्निशमन दलाची गाडी बोलावण्यात आली. घटनेची माहिती तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर दिली. इस्लापूरचे तलाठी शंकर मुंडे घटनास्थळी आले घटनास्थळाची पाहणी करून ताराच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे पंचनामा केला
दुकानाचे जळून नुकसान झाल्याची फिर्याद तहसील, पोलीस ठाणे यांना देण्यात आली. या आगीमध्ये नुकसान झालेल्या दुकानदारांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis