प्रशासकीय महिला अधिकार्यांवरील हल्ल्याप्रकरणी चौघे ताब्यात
नांदेड, 18 मार्च (हिं.स.)। शासकीय कर्तव्य बजावत असताना महिला ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मच्छिंद्र पार्डी (ता. माहूर) येथील लिलाव न झालेल्या शासकीय जमिनीवर ''पेरा पाहणी''साठी गेलेल्या दोन महि
प्रशासकीय महिला अधिकार्यांवरील हल्ल्याप्रकरणी चौघे ताब्यात


नांदेड, 18 मार्च (हिं.स.)।

शासकीय कर्तव्य बजावत असताना महिला ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मच्छिंद्र पार्डी (ता. माहूर) येथील लिलाव न झालेल्या शासकीय जमिनीवर 'पेरा पाहणी'साठी गेलेल्या दोन महिला ग्राम महसूल अधिकाऱ्यांना काही व्यक्तींनी शेतात बांधून मारहाण केली होती.

या हल्ल्यादरम्यान कर्मचाऱ्यांचे मोबाइलही काढून घेतले गेले. सिंदखेड पोलिसांनी तत्परतेने चौकशी करून आरोपींना नांदेड व पुसद येथून ताब्यात घेतले.माहूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता संशयित पुरुष आरोपींना पोलिस कोठडी, तर संशयित महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

कारवाईसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक अबीनाश कुमार, भोकरचे अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, माहूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी किरण भोंडवे यांनी विशेष लक्ष दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande