गुढी पाडवा, रमजान ईदवर महागाईचे सावट..!
नांदेड, 18 मार्च (हिं.स.)। एकीकडे गुढीपाडवा नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरु आहे, तर दुसरीकडे रमजान ईद देखील जवळच आली असून त्यानिमित्त खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. मात्र, यंदा या सणांवर महागाईचे तसेच युद्धाचे सावट दिसून येत आहे. गुढीपाडवा हा
गुढी पाडवा, रमजान ईदवर महागाईचे सावट..!


नांदेड, 18 मार्च (हिं.स.)।

एकीकडे गुढीपाडवा नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरु आहे, तर दुसरीकडे रमजान ईद देखील जवळच आली असून त्यानिमित्त खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. मात्र, यंदा या सणांवर महागाईचे तसेच युद्धाचे सावट दिसून येत आहे.

गुढीपाडवा हा एक हिंदू संस्कृतीतील मोठा अतिशय महत्वाचा सण असून हिंदू दिनदर्शिकाप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिला दिवसाला साजरा होणारा हा एक प्रमुख सण आहे. शालिवाहन संवत्सर हा पहिला दिवस वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे साडेतीन मुहूर्तपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, घर खरेदी, नवीन व्यवसाय सुरुवात करणे, सुवर्ण खरेदीसह नवीन उपक्रमास प्रारंभ केला जातो. घराच्या प्रवेश द्वारावर उंचावर उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

गुढीपाढव्याला ग्रामीण भागात शेतकरी वर्गात मोठे महत्त्व आहे. खगोलीय वेळापत्रक म्हणजे या दिवसापासून नवपंचांग सुरू होऊन पाहिले जाते. शेतकऱ्याचा नवे वर्ष सुरू होते. यंदा कुठले पीक घ्यावे शेतीची मशागतीची जुळवणी नवीन सालगडी, अवजारांची पूजा केली जाते.

गुढीपाडव्यानिमित्त दुकाने सजलेली दिसून येत आहेत. मात्र या सणावर महागाईचे सावट दिसून येत आहे. लगेच दोन दिवसांनी रमजान ईद साजरी केली जाणार असल्याने किराणा दुकानदारकडे गर्दी वाढत आहे. कापड दुकान, रंग रंगोटीसाठी रंग खरेदीसाठी दुकानात काहीशी गर्दी दिसून येत आहे. सुकामेवा, शेवया, खोबरे, पादत्राणे दुकाने मोठया प्रमाणावर थाटली गेली आहेत. यावर्षी ईद आणि गुढीपाडवा दोन दिवसाच्या अंतरावर साजरी केली जाणार असल्याने तयारी सुरू झाली आहे. मात्र, शेतकरी वर्गाने कापड, सोने चांदी, नवीन वस्तू खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

जीवनावश्यक वस्तू दरवाढ, गॅस सिलींडर दरवाढ, खाद्यतेल भाववाढीने सर्वसामान्यांचे मासिक बजेट कोलमडले आहे. आखाती देशात सुरू आहे त्याचे परिणाम सर्वत्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या सणावार महागाई, आखाती देशातील युद्ध, अवकाळी पाऊस पीक नुकसानीचे सावट पसरले आहे. कापड आणि सराफा बाजारात सोन्याचे उच्चांकी वाढते दरामुळे शुकशुकाट तर रियल इस्टेटमध्ये मंदी पसरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande