गुढीपाडव्याला हापूसचा तुटवडा; तापमानातील बदलामुळे उत्पादनात घट
पुणे, 18 मार्च (हिं.स.)।गुढीपाडव्याच्या मुहर्तांवर बाजारात कोकणातून हापूसची आवक वाढते, तसेच खरेदीही मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, यंदा गुढीपाडव्याला बाजारात हापूसचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. तापमानातील चढ-उतार, दमट वातावरण, थ्रिप्स, तुडतुड
गुढीपाडव्याला हापूसचा तुटवडा; तापमानातील बदलामुळे उत्पादनात घट


पुणे, 18 मार्च (हिं.स.)।गुढीपाडव्याच्या मुहर्तांवर बाजारात कोकणातून हापूसची आवक वाढते, तसेच खरेदीही मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, यंदा गुढीपाडव्याला बाजारात हापूसचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. तापमानातील चढ-उतार, दमट वातावरण, थ्रिप्स, तुडतुड्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने हंगामाच्या पहिल्या टप्यामध्ये बागांमध्ये मोहोर टिकला नाही. यंदा मोठ्या प्रमाणावर मोहोर येऊनही प्रत्यक्षात फळधारणा कमी झाल्याने उत्पादनात घट झाली.अक्षय तृतीयेला पूर्वजांना आंब्याचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. त्यानंतर आंबा खाल्ला जातो. मात्र, गुढीपाडव्याच्या मुहूर्तांवर आंब्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते, तसेच कोकणातून आंब्याची आवकही वाढते. गुढीपाडवा गुरुवारी आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात हापूसची आवक अतिशय तुरळक प्रमाणावर होत असून, बाजारात मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा खरेदीचा मुहूर्त यंदा हुकणार आहे. बाजारात सध्या केरळ, कर्नाटक, तसेच बाणकोट परिसरातील आंब्याची आवक होत आहे. मात्र, केरळ, कर्नाटकातील आंब्याला फारशी मागणी नसल्याचे सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande