ईदच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद शिष्टमंडळाची जिल्हा प्रशासनाला भेट
छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च (हिं.स.)। येत्या २१ मार्च रोजी साजरा होणाऱ्या ईद-उल-फित्र सणाच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील दर्गा हद्दे कला व हद्दे खुल्द कमिटीच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. शिष्टमं
ईदच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद शिष्टमंडळाची जिल्हा प्रशासनाला भेट


छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च (हिं.स.)।

येत्या २१ मार्च रोजी साजरा होणाऱ्या ईद-उल-फित्र सणाच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील दर्गा हद्दे कला व हद्दे खुल्द कमिटीच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक

अपराजिता अग्निहोत्री यांची भेट घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. निवेदनात ईदच्या काळात शहरात मुबलक व नियमित पाणीपुरवठा करावा तसेच स्वच्छतेची चोख व्यवस्था ठेवावी. पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात

करावा. विविध विभागांनी समन्वय साधून वेळेत उपाययोजना कराव्यात. या शिष्टमंडळात दर्गा कमिटी हद्दे कला अध्यक्ष एजाज अहमद, शरफोद्दीन रमजानी, अॅड. कैसरोद्दीन तसेच मोहम्मद मतीन जागीरदार यांचा समावेश होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande