पुणे : मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी सुनावणीला तिसऱ्यांदा मुदतवाढ
पुणे, 18 मार्च (हिं.स.) : मुंढवा येथील सरकारी जमीन गैरव्यवहारप्रकरणी केलेल्या दस्तनोंदणीत अमेडिया कंपनीने मुद्रांक शुल्क बुडविल्याबाबत नोंदणी विभागाने सुनावणीसाठी आता तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ एप्रिल र
पुणे : मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी सुनावणीला तिसऱ्यांदा मुदतवाढ


पुणे, 18 मार्च (हिं.स.) : मुंढवा येथील सरकारी जमीन गैरव्यवहारप्रकरणी केलेल्या दस्तनोंदणीत अमेडिया कंपनीने मुद्रांक शुल्क बुडविल्याबाबत नोंदणी विभागाने सुनावणीसाठी आता तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ एप्रिल रोजी होणार आहे. या संदर्भात सुनावणी घेण्यात आली. त्यात कंपनीने म्हणणे मांडण्यासाठी पुन्हा पुढील तारीख देण्याची मागणी केली होती. आता पुढील सुनावणीवेळी नोंदणी विभाग नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.मुंढवा येथील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या जमीन गैरव्यवहारात मुद्रांक शुल्क बुडविल्यानंतर सहजिल्हा निबंधक कार्यालयाकडून सात टक्के मुद्रांक शुल्क अर्थात २१ कोटी रुपये तसेच २० मे २०२५ या दस्त नोंदणीच्या तारखेपासून आजवर असा १ टक्केप्रमाणे १ कोटी ४७ लाख दंड असा एकूण २२ कोटी ४७ लाख रुपयांची रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. ही रक्कम भरण्यासाठी पुढील दोन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत १२ फेब्रुवारीला संपली. त्यानंतर कंपनीकडून नोंदणी विभागाकडे या प्रकरणी सुनावणी ठेवण्यात आली होती. यात कंपनीच्या वकिलांनी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मुदतवाढ मिळावी अशी विनंती केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande