प्रदूषण आणि तापमानवाढीमुळे वनस्पती, सजीवांना धोका -खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर
छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च (हिं.स.)। पृथ्वी हा जीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह असून वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ (Global Warming) यामुळे पृथ्वीच्या अस्तित्वावर तसेच वनस्पती व सजीवांसमोर अनेक धोके निर्माण झाले आहेत, असे प्रतिपादन एमजीएम विद्याप
Q


छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च (हिं.स.)।

पृथ्वी हा जीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह असून वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ (Global Warming) यामुळे पृथ्वीच्या अस्तित्वावर तसेच वनस्पती व सजीवांसमोर अनेक धोके निर्माण झाले आहेत, असे प्रतिपादन एमजीएम विद्यापीठातील एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक डॉ.श्रीनिवास औंधकर यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सहकारमहर्षी बाळासाहेब पवार अध्यासन केंद्र व ललित कला विभागातर्फे बाळासाहेब पवार जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान व सहकार चळवळ संदर्भात पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर होते. प्रमुख व्याख्याते म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ प्रा. श्रीनिवास औंधकर हे उपस्थित होते. यावेळी केंद्राचे संचालक व विभागप्रमुख डॉ.शिरीष अंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. श्रीनिवास औंधकर यांनी 'चला पृथ्वीला समजून घेऊया या या विषयावर व्याख्यान दिले. पृथ्वीवरील हवामानाचे चक्र केवळ स्थानिक कारणांवर अवलंबून नसून त्यात सूर्यावरील डाग (Sunspots) आणि अंतराळातील बदलांचा कसा सहभाग असतो, हे त्यांनी अनेक भाषणांतून स्पष्ट केले. अंतराळातून पृथ्वीवर आदळणारे लघुग्रह (Asteroids) आणि त्यापासून पृथ्वीचा बचाव करण्यासाठी चाललेल्या मोहिमा (उदा. DART मिशन) याबद्दल त्यांनी सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी ते पृथ्वीबाहेर जीवन आहे का? किंवा विश्वाची उत्पत्ती कशी झाली? यासारख्या प्रश्नांवर सोप्या भाषेत संवाद साधला. त्यांनी पृथ्वीच्या अनेक संवेदनशील व विश्वसनीय घटनाक्रमावर भाष्य केले. व प्लास्टिक बंदीचे आव्हानही डॉ औंधकर यांनी केले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande