पुण्यात भाजप आणि रिपब्लिकन पक्षात अंर्तगत वाद
उपमहापौरांवर निर्माण झाला सन्मानाचा प्रश्न पुणे, 18 मार्च (हिं.स.) : पुणे महापालिकेतील उपमहापौर पदासाठी आरपीआयला (आठवले गट) सत्ता मिळाल्यानंतर सन्मानाची कमतरता जाणवत असल्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केले आहे. महापौरांच्या शेजारी उपमहा
पुण्यात भाजप आणि रिपब्लिकन पक्षात अंर्तगत वाद


उपमहापौरांवर निर्माण झाला सन्मानाचा प्रश्न

पुणे, 18 मार्च (हिं.स.) : पुणे महापालिकेतील उपमहापौर पदासाठी आरपीआयला (आठवले गट) सत्ता मिळाल्यानंतर सन्मानाची कमतरता जाणवत असल्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केले आहे. महापौरांच्या शेजारी उपमहापौरांसाठी बसण्याची व्यवस्था न होणे आणि शहरातील विविध कार्यक्रमांमध्ये उपमहापौरांसाठी जागा न ठेवल्याने यापुढेही संघर्ष चालू राहील, अशी माहिती वाडेकर यांनी दिली.

वाडेकर यांनी सांगितले की, उपमहापौर पदासाठी दिला जाणारा सन्मान आता विसरला जात आहे. विशेषतः, ‘महापौर चषक क्रीडा’ स्पर्धेतील कार्यक्रमात औंध-बोपोडी प्रभागात आयोजित स्पर्धेसाठीही उपमहापौर म्हणून डावलण्यात आले. “हे प्रकार नजरचुकीने होतात की जाणीवपूर्वक हेच समजत नाही,” वाडेकर यांनी नमूद केले.

यामुळे भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) पदाधिकारी यांच्यात अंर्तगत वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी उपमहापौर पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला योग्य सन्मान दिला जात होता, मात्र आता या सन्मानाचा विसर पडल्याची तक्रार वाडेकर यांनी व्यक्त केली आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande