
पुणे, 18 मार्च (हिं.स.) : पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या काही गावांमधून मिळकत कर वसूल न होण्यामुळे महापालिकेचे उत्पन्न घटले आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने महापालिकेला मार्गदर्शन दिले आहे. मात्र, या गावांमधून अद्याप कर वसूल करता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या परिस्थितीमुळे मिळकत कराचा भार इतर नागरिकांवर वाढत असल्याचे लक्षात आले असून, स्थानिक नागरिकांनी यावर तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.
महापालिकेने या गावांमधील कर आकारणीसाठी सभासदांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीला सर्व संबंधितांनी लेखी सूचना आणि मते सादर करावीत. त्यानंतर प्रशासनासह चर्चा करून योग्य तो मार्ग निश्चित केला जाईल. आवश्यकतेनुसार या प्रक्रियेत राज्य सरकारचे मार्गदर्शनही घेतले जाईल, असे महापौर मंजूषा नागपुरे यांनी सांगितले.------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु