
सोलापूर, 18 मार्च (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका अखेर संपल्या आता वेध लागले ते विधान परिषदेच्या निवडणुकीचे. सोलापूर जिल्ह्यात बरेच राजकीय समीकरणे बदलले आहेत अनेक काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते भारतीय जनता पार्टीत गेल्याने त्यांनाही विधान परिषदेवर जाण्याची संधी निर्माण झाली आहे.
तत्पूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निवड बुधवारी होणार आहे या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे यंदाचे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण साठी राखीव आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या 68 पैकी 38 सदस्यांमधून अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी या अध्यक्ष होतील अशी सुरुवातीला चर्चा झाली परंतु भविष्यातला मंत्रिपदाचा क्लेम या अध्यक्ष अध्यक्षदामुळे जाईल यामुळे शांभवी ताईंनी नकार दिल्याचे समजते. दादांच्याच कोट्यातून निवडून आलेले रामप्पा चिवडशेट्टी यांनी सुद्धा अध्यक्ष पदाचे स्वप्न पाहिले पण आता ते दादांच्या गोठात असल्याने त्यांनाही शांत राहावे लागणार आहे.तालुक्यातील सर्वच जागा भाजपच्या निवडून आणलेल्या बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या कडे अध्यक्ष पद जाईल अशी चर्चा झाली पण राजाभाऊंना सुद्धा पुन्हा आमदार व्हायचे आहे त्यामुळे त्यांनी स्पष्ट नकार दिल्याचे समजते. भाजपचे माढा जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांना संधी होती पण त्यांचे नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत असे दोन ठिकाणी झालेले मतदान हे त्यांच्यासाठी अडचणीचे ठरल्याचे बोलले जात आहे.आता संधी आहे ती म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे यांच्या पत्नी वंदना कांबळे यांना. यापूर्वी शिवाजी कांबळे यांनी जिल्हा परिषदेमध्ये सलग पाच वर्ष समाज कल्याण सभापती राहण्याचा मान मिळवला आहे. त्यांचा जिल्हा परिषदेचा अभ्यास निश्चितच त्यांच्या पत्नी अध्यक्ष झाल्यावर कामी येणार असे बोलले जाते. वंदना कांबळे जर अध्यक्ष झाल्या तर माढयाला तिसऱ्यांदा अध्यक्ष पदाचा मान मिळणार आहे. कुणी काहीही म्हणो पण अध्यक्ष पदाचा निर्णय हे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी हे दोन नेतेच येणार हे पण तितकेच खरे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड