छ. संभाजीनगर - सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये राहणार सुरू
छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च, (हिं.स.)। आर्थिक वर्ष संपत येत असल्याने तसेच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा मालमत्ता खरेदीकडे कल वाढण्याची शक्यता आहे. परिणामी दस्त नोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता तसेच इष्टांक पूर्ततेच्या दृष्टीने
छ. संभाजीनगर - सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये राहणार सुरू


छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च, (हिं.स.)। आर्थिक वर्ष संपत येत असल्याने तसेच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा मालमत्ता खरेदीकडे कल वाढण्याची शक्यता आहे. परिणामी दस्त नोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता तसेच इष्टांक पूर्ततेच्या दृष्टीने दि. 26 मार्च 2026, दि. 28 मार्च 2026, दि. 29 मार्च 2026 व दि. 31 मार्च 2026 या चार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार सुट्टीच्या दिवशी सुरू असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी तसेच अभिनिर्णय, कमी पडलेले मुद्रांक शुल्क आदी कामे विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी सह जिल्हा निबंधक वर्ग-1 यांनाही कार्यरत ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande