किनवटमध्ये २० ते २६ मार्च कालावधीत श्रीराम नवमी महोत्सव
नांदेड, 18 मार्च (हिं.स.)। किनवट येथील श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने चैत्र नवरात्र महोत्सव व श्रीराम नवमीनिमित्त २० ते २६ मार्च या कालावधीत श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. रामनगर येथील श्रीराम मंदिर परिसरात दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ या व
किनवटमध्ये २० ते २६ मार्च कालावधीत श्रीराम नवमी महोत्सव


नांदेड, 18 मार्च (हिं.स.)।

किनवट येथील श्रीराम मंदिर

संस्थानच्या वतीने चैत्र नवरात्र महोत्सव व श्रीराम नवमीनिमित्त २० ते २६ मार्च या कालावधीत श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. रामनगर येथील श्रीराम मंदिर परिसरात दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत प्रा. तपनकुमार मिश्रा आपल्या वाणीतून प्रभू श्रीरामांच्या पावन जीवनचरित्राचे कथन करणार आहेत. दरम्यान, गुरुवारी (ता. २६) रामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पहाटे पाचला महाअभिषेक व पूजन, सकाळी सातला सामूहिक आरती होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता शहरातून दुचाकी रॅली काढण्यात येईल. दुपारी बाराला प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार असून, त्यानंतर दुपारी १ वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता प्रभू श्रीरामांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थान, किनवट यांच्या वतीने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande