सोलापूर जनता बँकेसाठी फक्त 11.02 टक्के मतदान
सोलापूर, 18 मार्च, (हिं.स.) उच्चविद्याभूषीत सभासद असलेल्या सोलापूर जनता बँकेच्या निवडणुकीत फक्त 11.02 टक्के मतदान झाले. 51 हजार 494 पैकी फक्त पाच हजार 679 मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. अतिशय अल्प झालेल्या मतदानामुळे आश्चर्य होत आहे.सोलापूर जनता
सोलापूर जनता बँकेसाठी फक्त 11.02 टक्के मतदान


सोलापूर, 18 मार्च, (हिं.स.) उच्चविद्याभूषीत सभासद असलेल्या सोलापूर जनता बँकेच्या निवडणुकीत फक्त 11.02 टक्के मतदान झाले. 51 हजार 494 पैकी फक्त पाच हजार 679 मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. अतिशय अल्प झालेल्या मतदानामुळे आश्चर्य होत आहे.सोलापूर जनता सहकारी बँकेच्या 10 जागांसाठी 12 जण इच्छुक होते. त्यासाठी मतदान झाले.

कर्नाटकसह महाराष्ट्रातील 55 मतदान केंद्रांवर पाच हजार 679 मतदारांनी हक्क बजावला. या बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराकडून शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आला. मात्र 17 जागांपैकी सात जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित 25 किलोमीटर आतील 10 जागांसाठी 12 उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने या जागांसाठी निवडणूक लागली. राष्ट्रीय स्वंयमसेवक संघ परिवाराच्या पॅनलमध्ये विद्यमान नऊ जणांना संधी देण्यात आली. बिनविरोध झालेल्या सात नूतन संचालकांमध्ये पाच विद्यमान संचालकांचा समावेश आहे. 25 किलोमीटर बाहेरील चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. यात विद्यमान संचालक मिलिंद कुलकर्णी, डॉ. हर्षल डंबल, अमित आपटे तसेच चरणसिंह चव्हाण यांचा समावेश आहे. महिला मतदारसंघातील दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात विद्यमान संचालिका चंद्रिका चव्हाण आणि गौरी आमडेकर यांचा समावेश आहे. एससी-एसटी मतदारसंघातील एक जागाही बिनविरोध झाली असून त्यावर रवींद्र साळे यांची निवड झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande