
छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च (हिं.स.)।
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी महाराज डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्टस् सुवर्ण महोत्सवी वर्षाचा अर्थात पन्नासाव्या नाट्यमहोत्सवाच्या निमित्ताने अस्तित्व या नाटकाचे सादरीकरण झाले. लेखक सुशील बनकर आणि नाटकाचे दिग्दर्शन देखील सुशील बनकर यांनी केले आहे .नाटकात प्रिया हे पात्र उत्कर्ष चित्ते हिने साकारली असून प्रेम हे पात्र समीर भुईंगड यांनी साकारलेले आहे.
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांची मनस्थिती ,त्यांच्यावर ओढावणारे वाईट ,प्रसंग व उतरंडीचे जीवन, यातून मानवी भावनांचा खेळ, अस्तित्व या नाटकामधून मांडला गेला आहे . या नाटकाद्वारे स्त्रियांची समाज व्यवस्थेमधील सामाजिक स्थान याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे .आजची स्त्री ही स्वतःचा निर्णय घेण्यास सक्षम आहे हाच या नाटकाचा मुख्य गाभा आहे. या पद्धतीने लेखकाने या नाटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रिया आणि प्रेम यांच्या अवतीभवती हे नाटक फिरते.
पात्र परिचय
विजय -सुबोध जाधव
काकू -अबोली बंगाळे
हवालदार -युवराज सुतार
सागर -मुकेश ठाकूर
पेपरवाला -सुभाष वैरागड
मन- सतीश पाटील लिंबे वाडकर
नेपथ्य -युवराज सुतार
प्रकाश योजना -लक्ष्मण काळे संगीत -राजेश मिरगे ,उमेश शिंदे रंगभूषा- साधना विटोरे
वेशभूषा -सौरभ मोरे
केशभूषा -हेमलता ढमुने
स्त्रियांच्या हक्काची कथा सांगणारी ही कथा अतिशय बोधक पद्धतीने लेखक आणि दिग्दर्शक सुशील बनकर यांनी हाताळलेली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis