राजकारणात पूर्णविराम नसतो - पंतप्रधान
नवी दिल्ली , 18 मार्च (हिं.स.)। आज राज्यसभेतून ३७ सदस्य निवृत्त होत आहेत. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संसदीय योगदानाची प्रशंसा केली. निवृत्त होणाऱ्या सर्व सदस्यांच्या भूमिकेचे कौतुक करताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, त्यांनी
राजकारणात पूर्णविराम नसतो - पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली , 18 मार्च (हिं.स.)। आज राज्यसभेतून ३७ सदस्य निवृत्त होत आहेत. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संसदीय योगदानाची प्रशंसा केली. निवृत्त होणाऱ्या सर्व सदस्यांच्या भूमिकेचे कौतुक करताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, त्यांनी लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

निरोप सत्रात आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संसद ही एका ओपन युनिव्हर्सिटीसारखी आहे आणि नव्या खासदारांनी नेहमी शिकत राहिले पाहिजे. त्यांनी पुढे सांगितले की, सभागृहात विविध विषयांवर चर्चा होत असते आणि प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असते. काही गोड-कडू अनुभवही येतात; मात्र असा निरोपाचा क्षण आला की आपण सर्वजण पक्षीय भावनांपलीकडे जाऊन एकाच भावनेने विचार करतो. आपले सहकारी आता नव्या जबाबदाऱ्यांसाठी पुढे जात आहेत.

त्यांनी असेही नमूद केले की काही खासदार पुन्हा सभागृहात परत येऊ शकतात, तर काहीजण सामाजिक क्षेत्रात आपल्या अनुभवाचा उपयोग करतील. जे नेते पुन्हा सभागृहात येणार नाहीत, त्यांच्याबाबत त्यांनी सांगितले की राजकारणात कधीच पूर्णविराम नसतो आणि त्यांचे योगदान देशासाठी नेहमीच मौल्यवान राहील. पंतप्रधानांनी सर्व खासदारांना पक्षीय सीमांपलीकडे जाऊन परस्परांचा सन्मान करण्याचे आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की, हीच लोकशाहीची खरी ताकद आहे.

या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतील ज्येष्ठ नेत्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. एच. डी. देवगौडा, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की या नेत्यांनी आपल्या आयुष्यातील मोठा काळ संसदीय सेवेसाठी समर्पित केला आहे. नव्या खासदारांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि समाजाप्रती आपली जबाबदारी प्रामाणिकपणे व समर्पणाने पार पाडावी, असे त्यांनी सांगितले.

यासोबतच पंतप्रधानांनी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्या कार्याचेही कौतुक केले. त्यांनी म्हटले की हरिवंशजींनी सभागृहाची कामकाज शांत आणि संतुलित पद्धतीने चालवले. ते अत्यंत मेहनती असून देशभर प्रवास करून त्यांनी आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडली आहेत.आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदची प्रतिष्ठा कायम राखण्यावर आणि ज्येष्ठ नेत्यांकडून प्रेरणा घेण्यावर भर दिला. लोकशाही परंपरा मजबूत करण्यासाठी अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande