
पुणे, 18 मार्च, (हिं.स.)। उष्णतेच्या वाढत्या झळा, गॅसटंचाईमुळे वीजेच्या शेगडयांचा वाढलेला वापर व एकूणच वीजेची वाढत्या मागणीमुळे ग्रामीण भागाला अचानकच भारनियमनाला सामोरे जावे लागले आहे. हे अघोषित भारनियमन असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. राज्याच्या अनेक भागातील कृषी वाहिन्यांवर संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भारनियमन केले गेले. अनेकांना या चार तासांच्या भारनियमनाची माहितीच नसल्याने त्यांचे हाल झाले. दरम्यान भारनियमनाचा निर्णय वरिष्ठ पातळीवरुन झाल्यामुळे काहीच करता आले नसल्याचे स्थानिक अधिका-यांनी सांगितले.
दरम्यान देखील रात्री चार तास कृषी फीडरवरील ग्राहकांना भारनियमनाला सामोरे जावे लागणार असून किमान पुढील चार दिवस दररोज असे भारनियमन होण्याची शक्यता अधिकारी बोलून दाखवित आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु