सोलापूर - युगंधर नवरत्न पुरस्कार जाहीर
सोलापूर, 18 मार्च (हिं.स.)। युगंधर फाउंडेशन, सोलापूर यांच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारे प्रतिष्ठित “युगंधर नवरत्न पुरस्कार” यावर्षी जाहीर करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा प्रा. रेश्मा माने यांनी दिली. यावर्षी युगंधर फाउंडेशन आपल
सोलापूर - युगंधर नवरत्न पुरस्कार जाहीर


सोलापूर, 18 मार्च (हिं.स.)। युगंधर फाउंडेशन, सोलापूर यांच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारे प्रतिष्ठित “युगंधर नवरत्न पुरस्कार” यावर्षी जाहीर करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा प्रा. रेश्मा माने यांनी दिली. यावर्षी युगंधर फाउंडेशन आपला दशकपूर्ती सोहळा साजरा करीत असून मागील दहा वर्षांपासून संस्था पर्यावरण, शिक्षण, सामाजिक जनजागृती तसेच विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये सातत्याने कार्यरत आहे. या कार्याच्या परंपरेतून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना “युगंधर नवरत्न पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, असेही प्रा. माने यांनी सांगितले.

यावर्षीचे युगंधर नवरत्न पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे –पर्यावरण – संतोष धाकपाडे,कला – सचिन जगताप,आरोग्य – डॉ. व्यंकटेश मेतन,शिक्षण – प्रा. डॉ. युवराज सुरवसे,उद्योग – सविता जुजगार,महिला व बाल कल्याण – ऍड. सरिता मोकाशी,कृषी – डॉ. स्वाती थिटे,क्रीडा – श्रेया परदेशी,पत्रकारिता – विजय गायकवाडतसेच युगंधर फाउंडेशनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण व संशोधन क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल “युवा प्रेरणा पुरस्कार” यावर्षी माननीय पंकज सुतकर (प्लास्टिक विघटन संशोधन पेटंट) यांना प्रदान करण्यात येणार आहे.मागील दहा वर्षांत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या तसेच पर्यावरण आणि आरोग्य क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या दोन संस्थांना “युगंधर सामाजिक बांधिलकी पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये सोलापूर येथे व्यसनमुक्ती आणि युवकांसाठी कार्य करणारी “सारथी युथ फाउंडेशन, सोलापूर” तसेच बार्शी शहरात वृक्षारोपणाची व्यापक मोहीम राबवून शहर हरित करण्यासाठी कार्यरत असलेली “वृक्ष संवर्धन समिती, बार्शी शाखा” यांचा समावेश आहे.

२१ मार्च – जागतिक वन दिन आणि युगंधर फाउंडेशनच्या दशकपूर्ती निमित्ताने वनसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वन अधिकारी व वन कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान देखील या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी (उप महासंचालक, यशदा – निवृत्त आयएएस) उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक वनीकरण विभाग सोलापूरचे विभागीय वनाधिकारी लक्ष्मण आवारे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे उपस्थित राहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande