गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८0,886 मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल
गांधीनगर, 18 मार्च (हिं.स.)। पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज ''जग लाडकी'' गुजरातच्या मुंद्रा बंदरात यशस्वीरित्या दाखल झाले असून, ऊर्जा संकटाच्या काळात दिलासा मिळाला आहे. हे जहाज अंदाजे ८0,
jag laadki crude oil mundra port gujarat


गांधीनगर, 18 मार्च (हिं.स.)। पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी' गुजरातच्या मुंद्रा बंदरात यशस्वीरित्या दाखल झाले असून, ऊर्जा संकटाच्या काळात दिलासा मिळाला आहे. हे जहाज अंदाजे ८0,886 मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन बंदरात दाखल झाले. हे कच्चे तेल संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधून आयात करण्यात आले आणि जहाज फुजैराह बंदर येथे भरले गेले होते.

या जहाजाची एकूण लांबी २७४.१९ मीटर आणि रुंदी ५०.०४ मीटर आहे. या टँकरचे डेडवेट टनेज (एकूण भार वाहून नेण्याची क्षमता) अंदाजे १,६४,७१६ टन आणि ग्रॉस टनेज अंदाजे ८४,७३५ टन आहे.

या जहाजाचे मुंद्रा बंदरातील आगमन, मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात हाताळण्यात अदानी पोर्ट्सच्या सुविधांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते. अशा प्रकारची वाहतूक प्रमुख रिफायनरी कंपन्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण त्या आपले कामकाज अखंडित ठेवण्यासाठी आणि भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी या मालवाहतुकीवर अवलंबून असतात.

यापूर्वी, भारतीय ध्वज असलेल्या दोन एलपीजी वाहक जहाजांनी १६ आणि १७ मार्च रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करून भारतात आगमन केले होते. एमटी शिवालिक आणि एमटी नंदा देवी या जहाजांनी, अंदाजे ९२,७१२ मेट्रिक टन एलपीजी घेऊन शुक्रवारी (१३ मार्च) सकाळी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास केला.

आपल्या व्यावसायिक हितांचे रक्षण करण्यासाठी, भारत ऑपरेशन संकल्प अंतर्गत या प्रदेशातील सागरी हद्दीत सतत नौदल उपस्थिती राखतो. हा उपक्रम महत्त्वाच्या सागरी मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि जग लडकीसारख्या जहाजांचे सुरक्षित आगमन शक्य होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande