जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर
इस्लामाबाद , 20 मार्च (हिं.स.)।जागतिक दहशतवादाचा भूगोल पुन्हा एकदा बदलताना दिसत आहे. जगातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त देशांच्या यादीत आता पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो हा देश या यादीत अव्वल होता.
पाकिस्तान दहशतवाद निर्देशांकात अव्वल,


इस्लामाबाद , 20 मार्च (हिं.स.)।जागतिक दहशतवादाचा भूगोल पुन्हा एकदा बदलताना दिसत आहे. जगातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त देशांच्या यादीत आता पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो हा देश या यादीत अव्वल होता.

इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसच्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स (जीटीआय) अहवालानुसार, दहशतवादामुळे सर्वाधिक प्रभावित देश म्हणून पाकिस्तानला प्रथम स्थान मिळाले आहे. मागील १२ आवृत्त्यांपैकी प्रत्येक वेळी पाकिस्तानचा समावेश अव्वल दहा देशांमध्ये झाला आहे. जीटीआय 2026 च्या अहवालानुसार, बुर्किना फासो आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला असून पश्चिम आफ्रिकेतील नायजर तिसऱ्या स्थानावर आहे.

ग्लोबल टेररिझम इंडेक्स अहवालानुसार, २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये १,०४५ दहशतवादी घटना घडल्या. या हल्ल्यांमध्ये १,१३९ जणांचा मृत्यू झाला, तर १,५९५ जण जखमी झाले. गेल्या दशकातील हा सर्वात गंभीर आकडा मानला जात आहे.तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)सह विविध दहशतवादी संघटनांनी अफगाणिस्तानातील भूमीचा वापर प्रक्षेपण तळ, आश्रयस्थान आणि प्रशिक्षण केंद्र म्हणून केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. येथूनच टीटीपीने पाकिस्तानी सुरक्षा दलांवर आणि सामान्य नागरिकांवर सातत्याने हल्ले केले.२०२५ मध्ये टीटीपीच्या हल्ल्यांमध्ये २४ टक्क्यांची वाढ झाली असून घटनांची संख्या ५९५ तर मृतांची संख्या ६३७ पर्यंत पोहोचली.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनेही पाकिस्तानला जीटीआय यादीत अव्वल स्थानावर पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली. क्वेटा जवळ ‘जाफर एक्सप्रेस’ या प्रवासी रेल्वेचे अपहरण ही त्याची ठळक घटना ठरली. या घटनेत ४४२ प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले आणि अनेक जणांचा मृत्यू झाला.दरम्यान, ६.४२८ या जीटीआय गुणांसह भारत जागतिक स्तरावर १३व्या क्रमांकावर असून दक्षिण आशियात पाकिस्तान आणि अफगाणिस्ताननंतर तिसऱ्या स्थानावर आहे. २०२५ मध्ये भारताने दहशतवादविरोधी परिस्थितीत लक्षणीय सुधारणा नोंदवली. २०२४ च्या तुलनेत दहशतवादी हल्ल्यांच्या संख्येत ४३ टक्क्यांची घट झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande