अमेरिकेने इराणी कच्च्या तेलाच्या खरेदीवर 30 दिवसांची दिली सूट
नवी दिल्ली, 21 मार्च (हिं.स.)। पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणच्या तेल खरेदीवरील निर्बंधांमध्ये 30 दिवसांची तात्पुरती सूट जाहीर केली आहे. ही सूट फक्त समुद्रात आधीपासून असलेल्या इराणी तेलवाहू टँकरमधील त
US grants 30 day waiver Iranian crude oil sale


नवी दिल्ली, 21 मार्च (हिं.स.)। पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणच्या तेल खरेदीवरील निर्बंधांमध्ये 30 दिवसांची तात्पुरती सूट जाहीर केली आहे. ही सूट फक्त समुद्रात आधीपासून असलेल्या इराणी तेलवाहू टँकरमधील तेलाच्या खरेदीसाठी लागू राहणार आहे. यामागचा उद्देश जागतिक ऊर्जा पुरवठा वाढवणे आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवणे हा आहे.

इराण-इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानंतर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेचे ट्रेझरी मंत्री स्कॉट बेसेंट यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. ट्रेझरी विभागाच्या संकेतस्थळानुसार, ही सूट 20 मार्च ते 19 एप्रिल या कालावधीसाठी लागू असेल.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवून दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल 110 डॉलरच्या पुढे गेले आहेत. विशेष म्हणजे, 28 फेब्रुवारी रोजी संघर्ष सुरू होण्यापूर्वी हे दर सुमारे 70 डॉलर प्रति बॅरल होते.स्कॉट बेसेंट यांनी दिलेल्या निवेदनानुसार, या निर्णयामुळे जागतिक बाजारात अंदाजे 14 कोटी बॅरल कच्चे तेल लवकर उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे ऊर्जा उपलब्धता वाढेल आणि सध्या निर्माण झालेला पुरवठ्यावरील ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande