मेळघाटात 4 ठिकाणी जंगल सफारी; वाघ, अस्वले, सांबर पाहण्याची संधी
चिखलदरा, सेमाडोह, धारगड, नरनाळ्यास पर्यटकांची असणार पसंती अमरावती, 22 मार्च (हिं.स.)। विविध जैवविविधतेने परिपूर्ण अशा मेळघाटच्या जंगलात विविध प्राण्यांसह दुर्मिळ झाडे, दऱ्या-खोऱ्यांचा संगम आहे. एकाच ठिकाणी पर्यटकांना असा नैसर्गिक अनुभव देणाऱ्या म
मेळघाटात 4 ठिकाणी जंगल सफारी; वाघ, अस्वले, सांबर पाहण्याची संधी:चिखलदरा, सेमाडोह, धारगड, नरनाळ्यास पर्यटकांची असणार पसंती


चिखलदरा, सेमाडोह, धारगड, नरनाळ्यास पर्यटकांची असणार पसंती

अमरावती, 22 मार्च (हिं.स.)।

विविध जैवविविधतेने परिपूर्ण अशा मेळघाटच्या जंगलात विविध प्राण्यांसह दुर्मिळ झाडे, दऱ्या-खोऱ्यांचा संगम आहे. एकाच ठिकाणी पर्यटकांना असा नैसर्गिक अनुभव देणाऱ्या मेळघाट जंगलात पर्यटकांसाठी जंगल सफारीची सोयही आहे. आता शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. त्या वेळी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मेळघाट भ्रमंतीचा उत्तम पर्याय पर्यटकांसमोर तयार झाला आहे.

मेळघाट जंगलात वाघांसह अस्वल, सांभर, रानगवा यांसारखे विविध प्रकारचे प्राणी पर्यटकांना अनेकदा दर्शन देतात. सध्या शंभरावर वाघांची संख्या या जंगलात आहे. मेळघाटाचे जंगल विस्तीर्ण आहे. ते दऱ्या-खोऱ्यांचे आहे. झाडांची संख्या जास्त आहे. जंगल दाट आहे. त्यामुळे वाघांचे दर्शन होण्याचे प्रमाण कमी असते. तरीही अलीकडे अनेकदा पर्यटकांना जंगल सफारीदरम्यान वाघोबा दिसतो, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सफारीची वेळ : दररोज सकाळी ६ ते १० , दुपारी ३ ते ६. वाहन , क्षमता : एका जिप्सीत चालक, गाईडसह ६ पर्यटक. खर्च आणि अंतर : प्रती वाहन २,५०० , सुमारे ३० ते ४० कि.मी.

---------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande