रत्नागिरी : अनुसूचित जाती-जमाती अधिनियमानुसार दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील वारसास नियुक्तीपत्र
रत्नागिरी, 22 मार्च, (हिं. स.) : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 अंतर्गत दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील वारसास नियुक्ती देण्याच्या नियमानुसार पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते किशोर खोपकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. अनुसूचित जाती अ
खोपकर यांना नियुक्तीपत्र


रत्नागिरी, 22 मार्च, (हिं. स.) : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 अंतर्गत दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील वारसास नियुक्ती देण्याच्या नियमानुसार पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते किशोर खोपकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार अनुसूचित जाती व जमातीच्या ज्या व्यक्तीचा खून झाला आहे, त्या व्यक्तीच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे शासनाचा निर्णय आहे. तथापि सरळसेवेच्या शासन निर्णयात याबाबत स्पष्ट आदेश नसल्यामुळे बऱ्याच नियुक्ती रखडल्या होत्या. एकूण 960 प्रकरणांमध्ये नोकरी देणे प्रलंबित होते. या सर्वांचा विशेष आढावा घेऊन शासनाने या प्रकरणातील पात्र व्यक्तींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सामाजिक न्याय विभागात नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी जिल्ह्यातील किशोर खोपकर यांच्या भावाचा खून झालेला होता. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते किशोर खोपकर यांना चिपळूण येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात पहारेकरी या पदावर नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande