
अमरावती, 22 मार्च (हिं.स.)।
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने शहरातील अनेकांना लुबाडण्याचे प्रकार सुरूच आहेत. शहरातील जाफर जीन प्लॉट परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची तोतयाने १७ लाख ९० हजार रुपयांनी फसवणूक केली. संजय कैलास गुप्ता (वय ४७), असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. श्री. गुप्ता यांच्यासोबत अनोळखी व्यक्तीने संपर्क साधून गुंतवणुकीचे काही प्लॅन समजावून सांगितले होते. त्यानंतर त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर जॉइन करून घेतले. त्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफा मिळविण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. विश्वास संपादन केल्यानंतर संजय गुप्ता यांना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिलेल्या बँक अकाउंटवर पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार संजय गुप्ता यांनी १७ लाख ९० हजार रुपयांची गुंतवणूक केली. सुरवातीला आभासी पद्धतीने त्यांना फायदा होत असल्याचे दिसत होते. परंतु त्यांनी पैसे विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला असता ते झाले नाही. अनोळखी व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून १७ लाख ९० हजार रुपयांनी आपली फसवणूक केली, अशी तक्रार सायबर पोलिसांत दाखल केली होती. त्या आधारे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी