
परभणी, 22 मार्च (हिं.स.)।
शिवसेनेच्या संघटन बांधणीला नवी उर्जा आणि बळ मिळाले. मसला तांडा, लोणी ताडा, तुरा ताडा, टाकळगव्हाण ताडा येथील असंख्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे शिवसेनेत पक्षप्रवेश करून पक्षाच्या विचारांवर आपला ठाम विश्वास व्यक्त केला. जनतेचा वाढता प्रतिसाद हा शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर आणि जनहिताच्या धोरणांवर असलेल्या विश्वासाचे द्योतक आहे.
यावेळी अंनत वाकणकर यांची पाथरी शिवसेना तालुका प्रमुख पदावर व विनोद लोहगावकर यांची परभणी ग्रामीण शिवसेना तालुका प्रमुख पदावर तसेच पप्पू इनामदार यांची परभणी ग्रामीण अल्पसंख्यांक उपअध्यक्ष पदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis