सोलापूर - बालाजी अमाईन्स कंपनीचा सामाजिक उपक्रम
सोलापूर, 22 मार्च (हिं.स.)बालाजी अमाईन्स कंपनीच्यावतीने सीएसआर अंर्तगत मोहोळ येथिल कुरूल रेड वर असलेल्या मुकबधिर निवासी शाळेस १५ बंकबेड व ३० गाद्या या साहित्याचे वितरण कंपनीच्या सीएसआर विभागप्रमुख श्री अनिल विपत यांच्या करण्यात आले. शाळेचे मुख्याध्
bakji


सोलापूर, 22 मार्च (हिं.स.)बालाजी अमाईन्स कंपनीच्यावतीने सीएसआर अंर्तगत मोहोळ येथिल कुरूल रेड वर असलेल्या मुकबधिर निवासी शाळेस १५ बंकबेड व ३० गाद्या या साहित्याचे वितरण कंपनीच्या सीएसआर विभागप्रमुख श्री अनिल विपत यांच्या करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री वैभव शेटे सर यांनी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेडडी यांचे कडे मुकबधिर निवासी शाळेतील अडचणी व गरजांची माहीती दिली मुलांना साहित्य नसल्याने त्रास होत असल्याचे माहीती मागणीपत्राव्दारे दिली. यात मुलांना बंक बेड (दोन मजली खाट, डबल बेड) व गादया ची मागणी तसेच शाळेची इमारत जुनी झाली व लहान रूम तसेच वरील बाजुस पत्रे असल्याने मतिमंद मुलांना त्रास होतो शाळेत दोन खोल्यांचे बांधकाम करून मिळावे अशी मागणी केली होती. बालाजी अमाईन्स च्या संचालक मंडळानी व व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेडडी यांनी दोन खोल्यांचे बांधकामाच्या मागणीस मंजुरी दिली तसेच मुलांना १५ बंक बेड व ३० गादया शाळेस उपलब्ध करून मुलांची अडचण सोडवली. शाळेचे मुख्याध्यापक वैभव शेटे सर यांनी बालाजी अमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेडडी व संचालक मंडळाचे आभार मानले. या कार्यक्रमास बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर, देशमुख सर, सरवदे सर, अण्णाराव शिंदेसर, बंडगर सर, बसवराज अंटद ,अमोल गुंड तसेच शाळेतील मुलांचे पालक व शिक्षक उपास्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande