बीड जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मिळणार गती; नवीन एमआयडीसीसाठी हालचाली वेगवान
बीड, 22 मार्च (हिं.स.)। शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने औद्योगिक वसाहतीचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून माळापुरी, घोसापुरी आणि पेंडगाव परिसरात सुमारे ४०० हेक्टर जमिनीवर नवीन एमआयडीसी स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आ
बीड जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मिळणार गती; नवीन एमआयडीसीसाठी हालचाली वेगवान


बीड, 22 मार्च (हिं.स.)। शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने औद्योगिक वसाहतीचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून माळापुरी, घोसापुरी आणि पेंडगाव परिसरात सुमारे ४०० हेक्टर जमिनीवर नवीन एमआयडीसी स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या जमिनीच्या भूसंपादनाबाबत प्राथमिक चाचपणी सुरू असल्याचे स्पष्ट केले असून लवकरच याचा सविस्तर अहवाल सरकारला सादर केला जाईल. प्रस्तावित रेल्वे मार्ग आणि नजीकच्या तांत्रिक संस्थांमुळे या एमआयडीसीला पोषक वातावरण लाभणार आहे. यामुळे दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या हजारो तरुणांना जिल्ह्यातच कामाच्या संधी उपलब्ध होतील आणि जिल्ह्याची 'ऊसतोड मजुरांचा जिल्हा' ही ओळख पुसण्यास मदत होईल.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande