उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानेश्वरीबन, गाथाबन तयार करा : ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कदम
परभणी, 22 मार्च (हिं.स.)। आजच्या काळात वृक्षतोड हा खुप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही सृष्टी जिवंत ठेवायची असेल तर ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांच्या नावाने एक झाड लावा. त्या प्रत्येक झाडावर एक ओवी लावा. पडीक जमीनीवर सुखी जीवन भविष्यासाठी ज्
अ


परभणी, 22 मार्च (हिं.स.)।

आजच्या काळात वृक्षतोड हा खुप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही सृष्टी जिवंत ठेवायची असेल तर ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांच्या नावाने एक झाड लावा. त्या प्रत्येक झाडावर एक ओवी लावा. पडीक जमीनीवर सुखी जीवन भविष्यासाठी ज्ञानेश्वरीबन, गाथाबन तयार करा. असे प्रतिपादन ज्ञानेश्वर माऊली कदम ( छोटे माऊली) यांनी केले. अलंकापुरी नगरीत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात त्यांची किर्तन सेवा संपन्न झाली. पुढे बोलताना ज्ञानेश्वर माऊली कदम म्हणाले की, आपले नविन वर्ष पाडव्यापासून सुरू होते. यावेळी नवीन धान्य आलेले असते. वृक्षांना नवीन पालवी फुटते. नवीन वर्षाचे स्वागत निसर्गही करतो. या नविन वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक घरात, गावात पारायणे व्हावीत. प्रत्येकाने झाड लावावे, ते वाढवावे, जगवावे. निर्व्यसनी जीवन जगावे. जात मुक्त व्हावे. हा संकल्प करायला हवा.अठरापगड जाती जेव्हा एकत्र येतील तेव्हा भारत अधिक समृद्ध होईल. असेही ते म्हणाले. पारायण सोहळ्यास बाळूमामा झमकडे, गंगाधर आडळकर, रामप्रसाद साबू, राजेंद्र प्रसादजी मनियार, मुकुंद आष्टीकर,शिवनारायणजी नंदकिशोरजी बाहेती, डॉ. उमेश गायकवाड, डॉ. आशिष मेहता, प्रताप शिंदे, अप्पू सोळंके, नंदा भुतडा यांची विशेष उपस्थिती होती.

तारुण्य त्यागाने शोभते

- ह. भ. प. संजय महाराज पाचपोर

मानवी जन्मात प्रपंचासाठी वयाची गरज आहे .मात्र परमार्थासाठी वयाची गरज नाही. एवढेच नव्हे तर भोगाने तारुण्य शोभत नसून ,केवळ त्यागाने तारुण्य शोभते ,असे प्रतिपादन गोसेवक ह भ प संजय महाराज पाचपोर यांनी आर्शीवचनपर बोलताना केले आहे. ते फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यातील कीर्तनाचे पुष्प गुंफताना केले. पुढे बोलताना ह.भ.प.संजय महाराज पाचपोर म्हणाले की, भगवंताला निरपेक्ष भक्ती आवडते. निरपेक्ष जीवन असणाऱ्यांची अपेक्षा ईश्वर आणि समाज देखील पूर्ण करतो . फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याच्या यशामागे साधना आहे .मागील अनेक वर्षापासून फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या माध्यमातून पंडित महाराज डाके यांनी २०० गावांत सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्याच्या यशामागे या दोनशे गावातील पारायणांची साधना आहे.ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या माध्यमातून धर्म जागृतीचे कार्य सुरू केले आहे . असेही ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande