धारूर तालुक्यातील १२ गावांमध्ये पोलिस पाटील पदाची महिलांना संधी
बीड, 22 मार्च (हिं.स.)। धारूर तालुक्यातील ४८ महसुली गावांमध्ये पोलिस पाटीलपदी निवड झाली असून, तालुक्यातील गावांमध्ये महिलांना पोलिस पाटीलपदाची संधी मिळाली आहे. बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर नुकतीच निवड यादी जाहीर करण्
धारूर तालुक्यातील १२ गावांमध्ये पोलिस पाटील पदाची महिलांना संधी


बीड, 22 मार्च (हिं.स.)।

धारूर तालुक्यातील ४८ महसुली गावांमध्ये पोलिस पाटीलपदी निवड झाली असून, तालुक्यातील गावांमध्ये महिलांना पोलिस पाटीलपदाची संधी मिळाली आहे.

बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर नुकतीच निवड यादी जाहीर करण्यात आली. या यादीत आंबेवड गावात गोविंद शिंदे, आमला गावात मुकुंद सोळंके, अंजनडोहत सय्यद शहायेद, अरणवाडीत अनंत कांबळे, असोल्यात दिनेश शिंदे, चारदरीत विवेकानंद मायकर,

धारूर तालुक्यातील आसरडोहमध्ये अश्विनी पवार, घागरवाड्यात रूपाली नागरगोजे, कचारवाडीत ज्ञानेश्वरी गांधले, खोडसला उषा गोरे, कोथिंबीरवाडीत कल्पना येवले, कोयाळ येथे अनिता कराड, पहाडी दहिफळीत निकिता कबाडे, रुईमध्ये कृतिका दासखेड, सुरनरवाडीत उषा करे, तांदळवाडीत पूजा कवडे, तेलगावात ज्योती लगड, उमरेवाडीत विद्या मोराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande