
पुणे, 22 मार्च (हिं.स.)महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सीचालक-मालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सीचालक-मालक कल्याणकारी मंडळांतर्गत सभासद नोंदणी प्रक्रिया आता अधिक सुलभ झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरताना रिक्षाचालकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेऊन, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी विशेष पाऊल उचलले असून, कार्यालयात मदतीसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केला आहे. तसेच, विशेष हेल्पलाइन क्रमांकही जारी केलाअनेक रिक्षाचालकांना इंटरनेट कॅफेवर जाऊन किंवा मोबाईलवरून स्वतः अर्ज भरताना अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन पुणे आरटीओने सोमवार ते शुक्रवार या दिवसात सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत विशेष कर्मचारी नियुक्त केले आहेत. हे कर्मचारी रिक्षा, टॅक्सीचालक-मालकांना मंडळाचे सदस्य नोंदणी प्रक्रियेचे थेट मार्गदर्शन करणार आहेत.पात्र अर्जदारांनी https:/// ananddighekalyankarimandal. org/ home/ register या लिंकवर जाऊन नोंदणी पूर्ण करावी.आरटीओ कार्यालयाला फक्त प्रत्यक्ष भेटच नव्हे, तर दूरध्वनीवरून मदतीसाठी आरटीओने 020-26058080 हा विशेष हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. ज्या लाभार्थ्यांना काही शंका असतील किंवा अर्जाची स्थिती जाणून घ्यायची असेल, त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु