
नांदेड, 22 मार्च (हिं.स.)।
नांदेड शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वजिराबाद वाहतूक शाखेच्या वतीने जोरदार मोहीम राबविण्यात येत असून वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला आहे. वजिराबाद वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या ३८६ जणांवर कारवाई करत ४ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. वजिराबाद वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी १८ मार्च रोजी स्टेशन रोड, महावीर चौक, कलामंदीर, वर्कशॉप, राजकॉर्नर व छत्रपती चौक या ठिकाणी वाहणाची कागदपत्रे तपासणी केली. सोबतच ऑटो चालकांना गणवेश परिधान करणेबाबत सुचना दिल्या. वाहतूकीस अडथळा निर्माण करणारे वाहनांवर, ट्रिपल सिट वाहने, परवाना नसलेले वाहने, रस्त्यावर लागलेले अनधिकृत फळांचे हातगाडे यांच्या विरोधात 386 केसेस करून 4 लाख 50 हजार 50 रूपयाचादंड आकारण्यात आला.
वाढत असलेल्या वाहतुकीमुळे लोकांनी त्यांची चार चाकी, दोन चाकी वाहने कुठेही पार्क न करता पार्कीगचे ठिकाणी पार्क करावे, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल या प्रकारे कोणतेही फळ गाडे व इतर असे रस्त्यामध्ये लावुन अतिक्रमन करू नये. सिग्नलचे पालन करावे व वाहतुकीस अडथळा होईल अशी कोणतीही कृती करू नये व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा मोटार वाहन कायदा व इतर कायद्यान्वये कडक कार्यवाही करण्यात येईल बाबत पोलीस प्रशासनाचे वतीने आवाहन करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागरगोजे व त्यांचे पोलिस कर्मचारी यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis