परभणी - जोगवाडा शिवारात अंगावर वीज पडून बैल ठार तर गारपिटीमुळे पिकांचे नुकसान
परभणी, 22 मार्च (हिं.स.)। परभणी जिल्ह्यात अचानक झालेल्या हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस, गारपीट व विजेच्या कडकडाटाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिंतूर तालुक्यातील जोगवाडा शिवारात वीज पडून एका शेतकर्याचा बैल ठार झाल्याची घटना घडली,
अ


परभणी, 22 मार्च (हिं.स.)।

परभणी जिल्ह्यात अचानक झालेल्या हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस, गारपीट व विजेच्या कडकडाटाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिंतूर तालुक्यातील जोगवाडा शिवारात वीज पडून एका शेतकर्याचा बैल ठार झाल्याची घटना घडली, तर वाघी परिसरात गारपिटीमुळे पिके जमीनदोस्त झाली असून सोलार पंपांचेही नुकसान झाले आहे.

जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथील गट क्रमांक 138 मधील शेतकरी हरिभाऊ आंबाजी वाळके यांच्या शेतात ही घटना घडली. अचानक आलेल्या अवकाळी पावसासह विजांचा कडकडाट सुरू असताना वीज कोसळून त्यांच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे तलाठी भीमराव वाकळे, महसूल सेवक योगेश शिंदे व पोलीस पाटील पी. पी. वाकळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी प्रशासक संजय अंभोरे व माजी उपसरपंच सुनील मस्के उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकरी हरिभाऊ वाळके यांनी प्रशासनाकडे तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

दरम्यान, जिंतूर तालुक्यातील वाघी (धा.) परिसरात गारपिटीसह जोरदार अवकाळी पावसाने उभी पिके मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाली आहेत. गारांच्या तडाख्यामुळे शेतातील सौर पंपांच्या पाट्यांचे (सोलार पॅनल्स)ही नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पॅनल्स फुटल्याने शेतकर्यांवर दुहेरी आर्थिक संकट कोसळले आहे.

अवकाळी पाऊस, गारपीट आणि बदलत्या हवामानामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकर्यांच्या समस्यांमध्ये आणखी भर पडली आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

पांढरी पोरजवळा येथे सोलार पंपाचे नुकसान...

परभणी तालुक्यातील पांढरी पोरजवळा येथे झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वार्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. गट क्रमांक 24 मधील शेतकरी रखमाजी सखाराम चव्हाण यांच्या शेतातील सोलार डायनामिक पंपाची हानी झाली आहे. शेती सिंचनासाठी बसविण्यात आलेल्या साडेसात एचपी क्षमतेच्या सोलार पंपाचे पॅनल्स वादळी वार्यामुळे उडून जाणे व तुटणे असे प्रकार घडले. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande