कर्नाटक पोटनिवडणुकांसाठी काँग्रेसकडून दोन उमेदवारांची नावे जाहीर
नवी दिल्ली, 22 मार्च (हिं.स.)। काँग्रेस पक्षाने कर्नाटकातील आगामी विधानसभा पोटनिवडणुकांसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी स
KARNATAKA BYPOLL CONGRESS LIST


नवी दिल्ली, 22 मार्च (हिं.स.)। काँग्रेस पक्षाने कर्नाटकातील आगामी विधानसभा पोटनिवडणुकांसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे.

पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, पक्षाने बागलकोट (२४) विधानसभा जागेसाठी उमेश मेटी यांना उमेदवारी दिली आहे. तर दावणगेरे दक्षिण (१०७) जागेसाठी समर्थ मल्लिकार्जुन यांना तिकीट देण्यात आले आहे.

कर्नाटकातील या दोन जागांसाठी ९ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande