खरात प्रकरणात आयकर आणि वनविभागाची एन्ट्री होण्याची शक्यता, नव्याने तीन गुन्हे दाखल
Income Tax and Forest Department likely to enter Kharat case, three new cases registered
Special team's efforts


नाशिक, 22 मार्च (हिं.स.)।

- भोंदू बाबा अशोक खरातच्या सर्व प्रकरणांमध्ये आता आयकर विभागाची देखील एंट्री होणार असून लवकरच आयकर विभाग बेनामी संपत्ती प्रकरणी खरातच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व प्रकरणात आता अजून तीन नवीन तक्रारी दाखल झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. या सर्व प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून वन कायद्या अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन वनविभागाला देण्यात आले आहे त्यावर वनविभाग काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

भोंदू बाबा अशोक खरात याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 18 मार्च रोजी त्याला पहाटे अटक केली होती हा तपास गुन्हे शाखा कडून सुरुवात असताना स्वतंत्र एसआयटीची स्थापना करून हा तपास सुरू करण्यात आले आहे शनिवारी सायंकाळी चार तासापेक्षा अधिक वेळ अशोक खरात आणि त्याचा पीए म्हणून काम करणारा कार्यालयीन कर्मचारी निरज जाधव या दोघांनाही समोरासमोर बसून एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. यामध्ये नीरज जाधव याने अधिक माहिती दिल्याचे सांगितले जात आहे पण त्याबाबत मात्र गुप्तता पाळली जात आहे या प्रकरणातील महिलांशी संपर्क साधण्यांमध्ये नीरज जाधव हा प्रमुख असल्याचे समोर आलेले आहे त्याच्या फोनचे सीडीआर तपासले असता सुमारे 40 महिलांचे मोबाईल नंबर असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले दरम्यान या सर्व प्रकरणांमध्ये पुन्हा तीन नवीन तक्रारी देखील दाखल झाल्या असून आता ही संख्या सात वरती पोहोचली आहे.

दरम्यान या सर्व प्रकरणांमध्ये आता आयकर विभागाची देखील एंट्री होणार आहे कारण भोंदू बाबा असलेल्या अशोक खरात यांच्याकडे 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची बेनामी संपत्ती सापडली आहे यामध्ये ठाण्यातील एखादी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या समावेश असून असेच काही अधिकाऱ्यांच्या तसेच राजकीय नेत्यांच्या नावावरती देखील संपत्ती खरात याने घेतली असल्याचा संशय आयकर विभागाला असल्यामुळे याप्रकरणी लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे आत्तापर्यंत अशोक खरात येणे 100 हून अधिक वेळा विदेशामध्ये देखील फेऱ्या मारल्याच्या समोर आलेले आहे त्यामुळे आता कोणत्याही क्षणी आयकर विभाग यामध्ये येण्याची शक्यता काही सूत्रांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे नासिक मधील अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून या अधिकाऱ्यांनी सुगंध कस्तुरी आणि कोल्ह्याचे अवयव कुठून आणले याची चौकशी करावी अशोक खरात हा आपल्या भक्तांना सुगंध कस्तुरी खायला देत होता मग ती खरी होती का खोटी होती जर ती खरी असेल तर वन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होतो अशी मागणी करण्यात आली आहे यावर वनविभागाच्या वतीने अजून पर्यंत कुठलाही खुलासा करण्यात आला नसला तरीही कोणत्याही क्षणी वनविभाग निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे या प्रकरणाला अधिक नवीन वळण लागण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande