परभणी - काजल हिन्दूस्थानी यांचे ‘हिंदू युवती एवं महिला सशक्तिकरण’ विषयावर सोमवारी व्याख्यान
परभणी, 22 मार्च (हिं.स.)।‘नारी को मत समझो अबला या लाचार, वो जानती है अपना हक और अधिकार’ या प्रेरणादायी संदेशातून महिलांच्या सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी (दि. 23) सायंकाळी 5 वाजता अक्षदा मंगल कार्यालय येथ
परभणी - काजल हिन्दूस्थानी यांचे ‘हिंदू युवती एवं महिला सशक्तिकरण’ विषयावर सोमवारी व्याख्यान


परभणी, 22 मार्च (हिं.स.)।‘नारी को मत समझो अबला या लाचार, वो जानती है अपना हक और अधिकार’ या प्रेरणादायी संदेशातून महिलांच्या सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी (दि. 23) सायंकाळी 5 वाजता अक्षदा मंगल कार्यालय येथे ‘हिंदू युवती एवं महिला सशक्तिकरण’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी काजल हिंदुस्तानी या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार असून त्या महिलांच्या सन्मान, समृद्धी, सुरक्षा आणि सुदृढतेसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या बदलत्या काळात महिलांनी स्वतःचे हक्क आणि अधिकार ओळखून आत्मविश्वासाने पुढे कसे जावे, याविषयी त्या आपले विचार मांडणार आहेत. सध्याच्या सामाजिक परिस्थितीत महिला सशक्तिकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, युवतींनी शिक्षण, स्वसंरक्षण आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून स्वतःला सक्षम बनविण्याची गरज या व्याख्यानातून अधोरेखित करण्यात येणार आहे. तसेच समाजातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे.

या कार्यक्रमास परभणी शहर व परिसरातील महिला, युवती तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande