सोलापूर - लिंगायत स्मशानभूमीचा वाद पेटला
सोलापूर, 22 मार्च (हिं.स.)। महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत लिंगायत स्मशानभूमी श्री सिद्धेश्वर देवस्थानला देण्याच्या विषयावरून भाजपमधील सत्ताधारी दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात होटगी मठाने सातत्याने पाठपुरावा करत असताना प्रशासनाच
सोलापूर - लिंगायत स्मशानभूमीचा वाद पेटला


सोलापूर, 22 मार्च (हिं.स.)। महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत लिंगायत स्मशानभूमी श्री सिद्धेश्वर देवस्थानला देण्याच्या विषयावरून भाजपमधील सत्ताधारी दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

यासंदर्भात होटगी मठाने सातत्याने पाठपुरावा करत असताना प्रशासनाचा प्रस्ताव जाणून-बुजून महापौर आणि सभागृह नेते तसेच नगरसेवकांनी रद्द करत नव्याने दाखल झालेला सभासद प्रस्ताव मंजूर केल्याने सत्ताधारी पक्षातील दोन गट आमने-सामने आले आहेत. हे सर्व पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. देवेंद्र कोठे यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याने या घटनेचे तीव्र पडसाद आता लिंगायत समाजामध्ये उमटले आहेत.या प्रकरणात आता काशीजगद्गुरूंनी लक्ष घातले असून सर्व धर्मगुरू तसेच लिंगायत समाजाच्या प्रतिष्ठित व्यक्तींची होटगी मठात बैठक बोलावली आहे. या बैठकीत पालकमंत्री गोरे, महापौर विनायक कोंड्याल, आ. कोठे आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या विरोधात आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande