सोलापूर - महापौर विनायक कोंड्याल यांनी समन्वय साधत दाखविली प्रशासकीय कामकाजाची चुणूक
सोलापूर, 22 मार्च (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या महापालिका कामकाजाच्या पहिल्याच सभेत महापौर विनायक कोंड्याल यांनी तब्बल ५२ विषयांना मंजुरी दिली. अनेक मुद्द्यांवर विरोधकांना नामोहरम करत सर्वांशी समन्वय साधून महापौर व
Mahapoor Vinayak Kondya


सोलापूर, 22 मार्च (हिं.स.)।

सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या महापालिका कामकाजाच्या पहिल्याच सभेत महापौर विनायक कोंड्याल यांनी तब्बल ५२ विषयांना मंजुरी दिली. अनेक मुद्द्यांवर विरोधकांना नामोहरम करत सर्वांशी समन्वय साधून महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या प्रशासकीय कामकाजाची चुणूक दाखविली. दरम्यान, विरोधकांनी अनेक प्रस्ताव घाईगडबडीत दाखल केल्याने विषय चर्चेला आल्यानंतर त्यांची चांगलीच गोची झाल्याचे पाहायला मिळाले.

सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कर सवलत योजनेचा प्रस्ताव आणला होता. हा विषय चर्चेला येताच परंतु सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी यांनी ही योजना भाजपा सत्तेत असताना २०१९ पासूनच लागू असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच या योजनेचा लाभ वीरपत्नी, स्वातंत्र्य सैनिक अशा घटकातील ७५० कुटुंबे घेत असल्याचेही सांगितले.कर थकबाकीदारांनी ३१ मार्चपूर्वी कर भरल्यास त्यांना सोलापूर महानगरपालिकेकडून शास्ती फी मध्ये ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती. परंतु अधिकाधिक कर वसुली व्हावी आणि महापालिकेत चे उत्पन्न वाढावे याकरिता सत्ताधारी भाजप सदस्यांनी ही शास्ती फी १०० टक्के माफ करावी असा प्रस्ताव सभेत सादर केला. यावर महापौर विनायक कोंड्याल यांनी सकारात्मक निर्णय घेत १०० टक्के शास्ती फी माफी देण्याचा निर्णय घेतला. यातून कर वसुली मोठ्या प्रमाणात होणार असून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande