परभणी -भाजप अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी मिलिंद सावंत यांची निवड
परभणी, 22 मार्च (हिं.स.)।भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीचे पत्र देताना भाजप निवडणूक प्रभारी दिनकर वाघ, जिल्हा सरचिटणीस आकाश लोहट,
अ


परभणी, 22 मार्च (हिं.स.)।भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडीचे पत्र देताना भाजप निवडणूक प्रभारी दिनकर वाघ, जिल्हा सरचिटणीस आकाश लोहट, डॉ. पंडित दराडे, प्रसाद खारकर, भाजप तालुकाध्यक्ष गणेश काटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे, यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नियुक्तीनंतर मिलिंद सावंत यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करून अनुसूचित जाती विभाग अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, या नियुक्तीबद्दल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि परभणी भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांचे सावंत यांनी आभार व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande