पंतप्रधान मोदींकडून जागतिक जल दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा
नवी दिल्ली , 22 मार्च (हिं.स.)।आज जगभरात जागतिक जल दिन साजरा केला जात असून, यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी अधोरेखित केले की पाणी हे केवळ जीवनाचा आधार नसून पृथ्वीच्या भविष्यास आकार देणारा महत्त्वाचा घटक
पंतप्रधान मोदींनी जागतिक जल दिनानिमित्त नागरिकांना दिल्या शुभेच्छा


नवी दिल्ली , 22 मार्च (हिं.स.)।आज जगभरात जागतिक जल दिन साजरा केला जात असून, यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी अधोरेखित केले की पाणी हे केवळ जीवनाचा आधार नसून पृथ्वीच्या भविष्यास आकार देणारा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखणे ही आपली जबाबदारी असून त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले की, जागतिक जल दिनाच्या निमित्ताने आपण प्रत्येक थेंब पाणी वाचवण्याचा आणि जबाबदारीने वापरण्याचा संकल्प पुन्हा करूया. त्यांनी नागरिकांना पाण्याचा सुरक्षित, जबाबदार आणि शाश्वत पद्धतीने वापर करण्याचे आवाहन केले. तसेच, शाश्वत पद्धती अवलंबणारे, जनजागृती करणारे आणि संवर्धनाची संस्कृती वाढवणाऱ्या लोकांचा सन्मान करण्याची ही योग्य वेळ असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

संयुक्त राष्ट्र संघाच्या मते, जागतिक जल दिनाचा मुख्य उद्देश शाश्वत विकास उद्दिष्ट ६ (SDG-6) पूर्ण करणे हा आहे, ज्याचा हेतू 2030 पर्यंत सर्वांना सुरक्षित पाणी आणि स्वच्छता उपलब्ध करून देणे हा आहे. यंदाच्या जागतिक जल दिन मोहिमेत पाण्याशी संबंधित निर्णयप्रक्रियेत महिलांना समान हक्क, नेतृत्व आणि संधी देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश समाजात जलसंवर्धन आणि समान सहभागाची संस्कृती वाढवणे हा आहे.

दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश पाण्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि जलसंवर्धनाच्या सवयी वाढवणे हा आहे. आजही जगातील अनेक लोक स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेच्या अभावाशी झुंज देत आहेत, तसेच जलस्रोत सातत्याने कमी होत आहेत.

संयुक्त राष्ट्र संघाने 1993 मध्ये हा दिवस घोषित केला, जेणेकरून —पाण्याचा योग्य वापर आणि संवर्धनाला प्रोत्साहन मिळावे. लोकांनी शाश्वत जलव्यवस्थापन आणि स्वच्छतेचे महत्त्व समजून घ्यावे.जलसंकट आणि पाण्याशी संबंधित पर्यावरणीय समस्यांकडे जागतिक लक्ष वेधले जावे. सरकार आणि समाजाने एकत्र येऊन सर्वांसाठी सुरक्षित पाणी उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande