तिवसा शहरात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा
नागरिक हैराण, चार पेट्रोल पंप ठप्प अमरावती, 22 मार्च (हिं.स.)। तिवसा शहरातील चार पेट्रोल पंपांवर आज पेट्रोल व डिझेलचा काही प्रमाणात तुटवडा जाणवला. यामुळे शहरातील वाहन चालक तसेच दुचाकी चालकांची मोठी कोंडी निर्माण झाली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर स
तिवसा शहरात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा


नागरिक हैराण, चार पेट्रोल पंप ठप्प

अमरावती, 22 मार्च (हिं.स.)।

तिवसा शहरातील चार पेट्रोल पंपांवर आज पेट्रोल व डिझेलचा काही प्रमाणात तुटवडा जाणवला. यामुळे शहरातील वाहन चालक तसेच दुचाकी चालकांची मोठी कोंडी निर्माण झाली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटू लागले असून, त्याचा थेट परिणाम इंधन पुरवठ्यावर झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान पेट्रोल पंप संचालकांच्या मागणी व क्रेडिटचा विषयदेखील समोर येत आहे. आज सकाळ पासून अनेक पेट्रोल पंपांवरील पेट्रोलचा साठा पूर्णपणे संपल्याने काही पंप बंद ठेवण्याची वेळ आली. काही ठिकाणी डिझेलचाही तुटवडा जाणवला. ज्यामुळे उपलब्ध इंधनासाठी वाहनधारकांनी मोठी गर्दी केली. परिणामी, अनेक पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. इंधन भरण्यासाठी नागरिकांना तासन् तास प्रतीक्षा करावी लागत असून, काही ठिकाणी किरकोळ वादाचे प्रसंगही घडल्याची माहिती आहे. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे शालेय वाहतूक, दैनंदिन कामकाज, शेतीची कामे तसेच छोटे-मोठे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी व कामगार वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे. शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री, पाणी पंप तसेच मालवाहतूक यावर परिणाम होत असल्याने आर्थिक चक्र विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

---------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande