किनवट तालुक्यातील धानोरा येथे पोलिसांची धाड ; ४.७२ लाखांचा गुटखा जप्त
नांदेड, 22 मार्च (हिं.स.)। किनवट तालुक्यातील धानोरा येथे किनवट पोलिसांनी धाड टाकून ४ लाख ७२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून दोन जणांविरुद्ध किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत पोलिसांनी ९ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल
किनवट तालुक्यातील धानोरा येथे पोलिसांची धाड ; ४.७२ लाखांचा गुटखा जप्त


नांदेड, 22 मार्च (हिं.स.)।

किनवट तालुक्यातील धानोरा येथे किनवट पोलिसांनी धाड टाकून ४ लाख ७२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून दोन जणांविरुद्ध किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत पोलिसांनी ९ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस उपनिरीक्षक झाडे व त्यांचे सहकारी हे त्यांच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, किनवट तालुक्यातील धानोरा येथे शासनाने बंदी घातलेला गुटख्याचा साठा करण्यात आला आहे. त्या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक झाडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन धाड टाकली असता घरासमोर उभी असलेल्या बलोरो वाहनात पोलिसांना राज निवास, गोवा, विमल अनारपान मसाला, तंबाखू, नजर पान तंबाखू, वेगवेगळ्या प्रकारचे तंबाखू मिळाले असून त्यांची किंमत ४ लाख ७२ हजार रुपये आहे. पोलिसांनी बलोरो जीप व संगुधित गुटखा असा ९ लाख ७२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने बंदी घातली असताना नियमबाह्य विक्री व वाहतूक करताना धानोरा येथे ही कारवाई केलीआहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक झाडे यांच्या तक्रारीवरून किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कराड, पोलिस उपनिरीक्षक झाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande