गहिनीनाथ महाराज औसेकर (पंढरपूर), श्रीनिवास पुराणिक (वाराणसी) यांना पुरस्कार
नांदेड, 22 मार्च (हिं.स.)। वामननगर येथील श्री रेणुकामाता मंदिराशेजारी सुरू असलेल्या याज्ञवल्क्य वेदपाठशाळेचा २२ वा वर्धापनदिन यंदा शनिवार ११ एप्रिल रोजी उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुर
गहिनीनाथ महाराज औसेकर (पंढरपूर), श्रीनिवास पुराणिक (वाराणसी) यांना पुरस्कार


नांदेड, 22 मार्च (हिं.स.)।

वामननगर येथील श्री रेणुकामाता मंदिराशेजारी सुरू असलेल्या याज्ञवल्क्य वेदपाठशाळेचा २२ वा वर्धापनदिन यंदा शनिवार ११ एप्रिल रोजी उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता वेदपारायणाने होणार असून सकाळी ८ ते ११ या वेळेत श्री विष्णु पंचायतन (पंचकुंडी महायज्ञ) पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते १२ दरम्यान चतुर्वेद सेवा व यज्ञाची आरती होईल. सायंकाळी ६ वाजता 'अवघारंग एकही' या भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम रमाकांत चाटी व संगीता चाटी, नांदेड व त्यांच्या सहकाऱ्यांकडून सादर केला जाईल.

सायंकाळी ७ वाजता प्रमुख अतिथींचा सत्कार होणार आहे. अद्वैतवेदांतकोविद पंडित गुरुवर्य श्री गोपाळशास्त्री गोरे गुरुजी (श्रीक्षेत्र पंढरपूर) यांच्या स्मरणार्थ 'शास्त्री पुरस्कार' ह.भ.प. श्री गहिनिनाथ महाराज औसेकर (पंढरपूर) यांना प्रदान केला जाणार आहे. तसेच वे.शा.सं. घनपाठी गुरुवर्य लक्ष्मीकांत रामाचार्य पुराणीक गुरुजी (काशी) यांच्या स्मरणार्थ 'वैदिक पुरस्कार' वे.शा.सं. घनपाठी श्रीनिवास लक्ष्मीकांत पुराणिक (वाराणसी) यांना देण्यात येणार आहे. विशेष गौरव रुपेश नरहरराव किनेकर (जोशी) यांचा होईल.

याज्ञवल्क्य वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ वे.मू. देगलूरकर महाराज यांचे प्रवचन

श्री याज्ञवल्क्य वेदपाठशाळेच्या २२ व्या वर्धापन दिन महोत्सवानिमित्त शनिवारी ११ एप्रिल रोजी पंचकुंडात्मक श्री विष्णू पंचायतन महायज्ञ होणार आहे. सायंकाळी वाजता हभप चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे प्रवचन व दर्शन सोहळा होणार असल्याची माहिती श्री महर्षी याज्ञवल्क्य सेवा प्रतिष्ठाणचे वे.मु. मनोजगुरू जोशी (पेठवडजकर) यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande