उदगीर मतदार संघातील रस्त्यांसाठी २५ कोटी रूपयाची तरतुद - आ. संजय बनसोडे
लातूर, 22 मार्च (हिं.स.) उदगीर - जळकोट मतदार संघातील विविध रस्त्यांना राज्यमार्गाला जोडण्याकरिता व दर्जेदार रस्ते निर्माण करण्यासाठी परवा झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उदगीर-जळकोट मतदारसंघातील रस्त्यांसाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याच
संजय बनसोडे


लातूर, 22 मार्च (हिं.स.)

उदगीर - जळकोट मतदार संघातील विविध रस्त्यांना राज्यमार्गाला जोडण्याकरिता व दर्जेदार रस्ते निर्माण करण्यासाठी परवा झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उदगीर-जळकोट मतदारसंघातील रस्त्यांसाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे.

यामध्ये उदगीर तालुक्यातील पूर्णा-पालम-राणी सावरगांव-खंडाळी-काळेगांव-अहमदपूर-शिरूर ताजबंद-हाळी-उदगीर रस्ता राज्य मार्ग क्रमांक 249 रस्ता कि.मी. 192/800, 212/500 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ८० लक्ष रुपये तर

उदगीर तालुक्यातील पुर्णा पालम राणी सावरगांव खंडाळी काळेगांव मध्ये शिरूर उदगीर रा. मा. 249 कि.मी. 197/00 ते 208/00 मधील हाळी, सुकणी, गंडी पाटी व तोंडारपाटी गांवातील लांबी रुंदीकरण गटार, सीसी रोड सह सुधारणा करण्यासाठी

४ कोटी रुपये तर उदगीर तालुक्यातील हाळी-डोंगरज-हेर-करडखेल-सय्यदपूर-वळंदी-बोंबळी ते राज्य सीमा रस्ता राज्य मार्ग क्रमांक 252 कि.मी. 26/800 ते 28/000 मध्ये रस्त्याची सुधारणा करण्यासाठी १ कोटी २० लक्ष व भाकसखेडा ते प्रमुख जिल्हा मार्ग-38 पर्यंत रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 26, कि.मी 12/900 ते 18/000, कि.मी 25/000 ते 31/500 व कि.मी 42/000 ते 42/500 मध्ये रस्त्याची सुधारणा करण्यासाठी तब्बल ९ कोटी २५ लक्ष रुपये आणि उदगीर तालुक्यातील रा.मा. 245 ते आटोळा-उजळंब-रोहिणा-हेर-कुमठा-तोंडार ते रामा. 249 रस्त्याची सुधारणा करणे प्रजिमा-32 कि.मी. 13/500 ते 15/000 व कि.मी. 17/000 ते 28/400 मध्ये रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ८ कोटी ७५ लक्ष रुपये असे एकुण २५ कोटी रुपयाचा निधी रुपये मंजूर करण्यात आली असुन यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांची सोय होवून दळण - वळण व्यवस्था मजबुत आहे. मतदार संघातील बहुतांश रस्ते आमदार संजय बनसोडे यांनी पूर्ण केले असुन मतदार संघातील राहिलेली सर्व रस्ते येत्या काळात पूर्ण करुन उदगीर मतदार संघाला मोठ्या उंचीवर पोहवचवुन महाराष्ट्रात स्मार्ट सिटी म्हणून नावारूपाला आणण्याचा मानस आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.

मतदार संघातील रस्त्यासाठी २५ कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आ.संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande