
पुणे, 22 मार्च (हिं.स.)पुण्यातील टेकड्यांच्या परिसरात सध्या ‘वुल्फ डॉग’चा वावर वाढत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी पुणे महानगरपालिका आणि वनविभागाकडून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत उपाययोजना करण्यात येत असून ‘वुल्फ डॉग’ला पकडण्यासाठी ‘ऑपरेशन वुल्फ डॉग’ मोहीम राबविली जात आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक भागात या प्राण्याचे अस्तित्व आहे. पुण्यातील वेताळ, हनुमान टेकडी आणि राम नदीच्या पट्ट्यात वनरक्षकांची गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच ‘वूल्फ डॉग’नी नागरिक किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला केलेल्या परिसरात वन विभागाने पिंजरे लावले आहेत. तसेच वनविभागाने पकडलेल्या प्राण्याची ओळख पटविण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. तज्ज्ञांच्या तपासानंतर तो प्राणी लांडगा असल्याचे निश्चित झाल्यास त्याला सुरक्षितपणे पुन्हा जंगलात सोडण्यात येत आहे. तसेच वनविभागाने परिसरातील गृहसंकुले आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही केल्या आहेत. शहरातील बाणेर, पाषाण, कोथरूड आणि वारजे या टेकड्यांच्या परिसरात ‘वूल्फ डॉग’चा वावर असल्याचे आढळले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु