
पुणे, 22 मार्च (हिं.स.)
भोंदू बाबा अशोक खरात याने 400, 500, 800 कोटी रुपयांची मालमत्ता कोठून आणली? त्याच्या ट्रस्टला अनेक बक्षीसपत्र दिलेली असून, ती धाकधपाट्याने दिलेली आहेत का स्वइच्छेने दिलेली आहेत?, असा सवाल करत त्याच्या सेक्स रॅकेटचा कारभार संविधान पदावर असलेल्या महिलेच्या आशीर्वादाने चालत होता, असा गंभीर आरोप अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ट्रस्टमधल्या प्रत्येकाला आरोपी करणं आणि त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण एकटा खरात आरोपी नाही, असा दावाही त्यांनी केला.
एकनाथ शिंदे आमदारांना घेवून गुवाहाटीला गेले. संजय राऊत यांनी विषय काढला आहे तर तपासून घ्या. मला असं वाटतं की, जे आमदार गुवाहाटीला गेलेले होते, त्यांचा मार्ग अशोक खराने दाखवला असेल. दीपक केसरकर असतील, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हावी. कदाचित अशोक खरात त्याने त्याचे तोंड उघडेल तर मंत्रिमंडळात जवळपास पाच मंत्री आहेत. त्यांची नावे समोर येतील. माझी खासदार-आमदारांना हात जोडून विनंती आहे की, राजकारणाच्या तुमच्या कुरघोडीमध्ये तुमचे हेवेदावे भोंदू बाबा अशोक खराच्या याच्यात काढू नका.हा विषय जर थोडा जरी भरकटला, तर महाराष्ट्रातील माताभगिनींवर झालेल्या अन्यायाची सत्यता समोर येणार नाही, असे आवाहनही रुपाली ठोंबरे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु