सोलापुरात भाजप-काँग्रेस बॅनर वॉर तापलं
सोलापूर, 22 मार्च (हिं.स.)।सोलापूर शहरातील राजकारण सध्या बॅनरच्या मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यातील बॅनर वॉर चांगलाच तापला असून, आरोप-प्रत्यारोपांची पातळी थेट रस्त्यावर आली आहे.काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यां
सोलापुरात भाजप-काँग्रेस बॅनर वॉर तापलं


सोलापूर, 22 मार्च (हिं.स.)।सोलापूर शहरातील राजकारण सध्या बॅनरच्या मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यातील बॅनर वॉर चांगलाच तापला असून, आरोप-प्रत्यारोपांची पातळी थेट रस्त्यावर आली आहे.काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी मान खटाव येथील सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांना लक्ष्य करत बॅनरबाजी केली होती. त्यावर आता भाजप कार्यकर्त्यांकडून ‘जशास तसे’ उत्तर देण्यात आले आहे.

भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये “अपयशी शहराध्यक्ष हा मान मिळवून दिल्याबद्दल जयाभाऊंचे आभार” असा उपरोधिक मजकूर झळकला आहे. याचबरोबर, काँग्रेसच्या घसरत्या कामगिरीवर थेट निशाणा साधत ४४ नगरसेवकांवरून २ नगरसेवकांपर्यंत झालेली घसरण, तसेच विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याचा उल्लेख करत नरोटे यांच्यावर टीका करण्यात आली आहे.विशेष म्हणजे हा बॅनर नरोटे यांच्या प्रभागातच लावण्यात आल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे. सध्या शहरात “बॅनरला बॅनरने उत्तर” ही नवी राजकीय स्टाईल चर्चेचा विषय ठरली आहे.राजकारणात पोस्टरबाजी नवीन नाही, पण सोलापुरात सध्या ती ‘फुल HD’ मोडमध्ये सुरू असल्याचे चित्र आहे. पुढे हे बॅनर वॉर थांबते की अजून रंगते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande